अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक १२ सप्टेंबर २०२०, रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ४३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५०१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४११६ इतकी झाली आहे.
           जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १०९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १८४ आणि अँटीजेन चाचणीत २०८ रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, संगमनेर १०, नगर ग्रामीण ०३, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०५, नेवासा ०१, श्रीगोंदा ०१, पारनेर ०१, अकोले २१, राहुरी १९, शेवगाव ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १८४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३९, संगमनेर १२, राहाता १८, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण १०, श्रीरामपुर ३१, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ०९, श्रीगोंदा ०१, पारनेर ०६,अकोले ०८, राहुरी २४, कोपरगांव ०४, जामखेड ०८ आणि कर्जत ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.अँटीजेन चाचणीत आज २०८ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ३३, संगमनेर १०, राहाता ४२, पाथर्डी १७, श्रीरामपूर ०५, श्रीगोंदा २०, पारनेर ०९, अकोले २८, राहुरी ०२, शेवगाव ०१, कोपरगाव ०७, जामखेड १३ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           दरम्यान, आज ७०६ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २०२, संगमनेर ७१, राहाता ६०, पाथर्डी ४३, नगर ग्रा.३५, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट १४, नेवासा ४४, श्रीगोंदा २७, पारनेर २६, अकोले ४२, राहुरी ३०, शेवगाव ११, कोपरगाव ३९, जामखेड १९ कर्जत १७ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

   बरे झालेली रुग्ण संख्या: २५४३७
   उपचार सुरू असलेले रूग्ण: ४११६
   मृत्यू: ४६२
   एकूण रूग्ण संख्या: ३००९५

   (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आणखी बातम्या

निवडणूक आयोगाकडून गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील प्रकाशित करण्यास सुधारित मार्गदर्शक सूचना जारी.

कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा समृद्ध स्रोत

राज्य सरकारने राज्यातील सामान्य जनतेचे २४० कोटी रुपये परत द्यावे.

राज्यात ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी समित्यांची स्थापना.