अन्यथा सर्व महामार्गावर रास्तारोको – श्री. मनोज कोकाटे

           महामार्ग तसेच बायपास रोडवरील खड्डे बुजविण्या संदर्भात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई विरोधात भाजप नगर तालुक्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. अखेर लेखी आश्वांसनंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले.           यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, ‘पावसाळा सुरु झाल्यापासून सोलापूर, मनमाड, जामखेड, औरंगाबाद, पाथर्डी सह बायपास रोडची अत्यंत […]

मराठा आरक्षण संदर्भात भा.ज.पा. शिष्टमंडळाची खा. छत्रपती संभाजीमहाराज ह्यांच्या सोबत चर्चा.

            मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. खासदार छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी ह्याबाबत पुढाकार घेऊन याबाबत मा. पंतप्रधानांना भेटून या प्रश्नाविषयी चर्चा करावी अशी विनंती भा.ज.पा. शिष्टमंडळाने खा. छत्रपती संभाजीमहाराज याना केली आहे.           मराठा आरक्षणामुळे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. हा प्रश्न समाजाच्या जिव्हाळ्याचा असल्याने आपण याबाबत […]

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे मागणी, ‘कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने रद्द करावा.’

          केंद्र सरकारने 14 सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार कांदा निर्यातीस बंदी घातली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होण्याचा धोका संभवतो. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बाजारातील कांद्याचा पुरवठा सुरळीत व भाव आटोक्यात राहणे आवश्यक आहे मात्र या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे . गरज पडल्यास केंद्र सरकारने नाफेडच्या मार्फत खरेदी केलेल्या एक लाख क्विंटल […]

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६७ टक्के

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक: २० सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७३९ […]

केंद्र सरकारचे निर्णय हे शेतकऱ्याच्या व सर्वसामान्यांच्या विरोधी- महसूलमंत्री

          केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी आहे. अशी टीका महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरात यांनी आज केली. मा. बाळासाहेब थोरात हे आज नगर शहर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाची कॉंग्रेस तर्फे नगर शहरात सुरवात करण्यात आली.           कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी व दुधाची भुकटीची आयात […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ७०३ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दि. १९ सप्टेंबर २०२० रोजी, रात्री ७-०० वाजेपर्यंत जिल्ह्यात आज तब्बल १०५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार १९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.३७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा […]

राहत्या घराचे छत कोसळून आखेगाव ता.शेवगाव येथे एकाचा मृत्यू.

          आज सकाळी पहाटे ६ च्या सुमारास आखेगाव ता.शेवगाव येथे घराचे छत कोसळल्यामुळे नानाभाऊ शंकर कोल्हे, वय ७९ यांचा मृत्यू झाला.            सकाळी छत कोसळल्या मुळे आवाज झाला, तो ऐकून आसपासच्या परिसरातील लोकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. परंतु जास्त मोठा ढिगारा असल्यामुळे जेसीबी पाचारण करून ढिगारा हटवावा लागला. परंतु ढिगाऱ्या खाली दबल्या मुळे नानाभाऊंना आपले […]

गेवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र शनि महाराज संस्थान पाण्याखाली.

           गेवराई तालुक्यातील गोदाकाठी वसलेल्या श्रीक्षेत्र शनि महाराज संस्थान श्री क्षेत्र राक्षसभुवन तसेच श्रीक्षेत्र पांचाळेश्वर ही दोन्ही मंदिरे पूर्ण पाण्याखाली, नगर नाशिक औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे तसेच वरील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे. दि. १६ व १७ सप्टेंबर ला मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत होती. यामुळे […]

आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल १०५१ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज.

                     अहमदनगर जिल्ह्यात आज दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी, रात्री ७-०० वाजेपर्यंत तब्बल १०५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून […]

अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री मा.हसन मुश्रीफ करोना पॉझिटिव्ह.

           कालच जिल्हा आढावा बैठकी निमित्त अहमदनगरच्या दौऱ्यावर असलेले अहमदनगरचे पालकमंत्री मा.हसन मुश्रीफ यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तशी महिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. तसेच त्यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी असा सल्ला दिला आहे. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी.लवकरच कोरोनावर मात करून […]