महामार्ग तसेच बायपास रोडवरील खड्डे बुजविण्या संदर्भात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई विरोधात भाजप नगर तालुक्याच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. अखेर लेखी आश्वांसनंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले.
          यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले की, ‘पावसाळा सुरु झाल्यापासून सोलापूर, मनमाड, जामखेड, औरंगाबाद, पाथर्डी सह बायपास रोडची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. रोडवर अत्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या महामार्गंन वरती छोटे मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही जणांना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झालेल्या आहेत. अश्या प्रकारचे अपघात घडून त्यातून काही विपरीत घडल्यास यास कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न या वेळी त्यांनी उपस्थित केला.’
           १५ दिवसाच्या आत मुरुम टाकून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी ए.एम. कडूस यांनी लेखी आश्वांसन दिले. यामुळे तात्पुरत्या स्वरुपात आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र आश्वांसनाची अंमलबजावणी न झाल्यास, सर्व प्रमुख महामार्गावर रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा मनोज कोकाटे यांनी दिला आहे
          या आंदोलनात भाजप नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, जेष्ठनेते रमेश पिंपळे, तालुका सरचिटणीस बाप्पूसाहेब बेरड, गणेश भालसिंग, तालुका उपाध्यक्ष प्रशांत गहिले, पोपटराव शेळके, किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष महेश लांडगे, तालुका कोषाध्यक्ष गोवर्धन शेवाळे, सागर भोपे, चिटणीस विक्रम पालवे, गणिनीनाथ कांबळे, सुनील म्हस्के, निलेश दरेकर, शिवाजी बेरड, विजय गाडे, स्वप्निल मोरे, राहुल गुंड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार ४४८ रुग्ण बरे होऊन परतले घरी.

मराठा आरक्षणासंदर्भात भा.ज.पा. शिष्टमंडळाची खा. छत्रपती संभाजीमहाराज ह्यांच्या सोबत चर्चा.

रस्‍ते तातडीने दुरूस्‍त करा, अन्यथा काळे फासण्‍यात येईल ! महापौर वाकळे यांचा इशारा.

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे मागणी, ‘कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने रद्द करावा.’