गेवराई तालुक्यातील गोदाकाठी वसलेल्या श्रीक्षेत्र शनि महाराज संस्थान श्री क्षेत्र राक्षसभुवन तसेच श्रीक्षेत्र पांचाळेश्वर ही दोन्ही मंदिरे पूर्ण पाण्याखाली, नगर नाशिक औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे तसेच वरील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे. दि. १६ व १७ सप्टेंबर ला मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत होती. यामुळे दि. १८ सप्टेंबर ला पहाटे नाथ सागर धरणाचे सर्व गेट दोन फुटांनी उघडून गोदावरी पात्रात दुपारपर्यंत 94 हजार 327 पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे गेवराई तालुक्यातील गोदाकाठी वसलेल्या गावात पाण्याची पातळी अचानक वाढली तसेच काही गावाचा संपर्क देखील तुटला होता. प्रशासन परीस्थितीवर लक्ष्य ठेऊन असून, प्रशासकीय पथके मदतीसाठी ठेवण्यात आली आहेत. प्रशासनाचा आता कोरोना व पुरपरिस्थिती अशा दोन्ही मुळे ताण वाढला आहे.
          सध्या कोरोनामुळे मंदिरे बंद आहेतच आता धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे गेवराई तालुक्यातील गोदाकाठी वसलेल्या श्रीक्षेत्र शनि महाराज संस्थान, राक्षसभुवन तसेच श्रीक्षेत्र पांचाळेश्वर ही दोन्ही मंदिरे पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत. शनि महाराज संस्थान श्री क्षेत्र राक्षस भवन कार्यालय कार्यालयाला पाण्याचा वेढा पडला असून परिसरात पूर्ण पाणी घुसले आहे. या भागातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. शनि मंदिराच्या दुसर्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले आहे.आधीच कोरोना चे संकट घोगंवत असताना, आता ह्या पुर परीस्थिती मुळे नागरिक हतबल झाले आहेत. अशी भावना राक्षसभुवन येथील ग्रामस्त व शनीचे पुजारी श्री. मयूर पाठक यांनी व्यक्त केली.

आणखी बातम्या

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होऊ या!

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पथक नियुक्त.

जनऔषधि केंद्रांची संख्या १०५०० पर्यंत वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य.