शिर्डी साईप्रसादालयामध्‍ये सुमारे ०१ लाख १० हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला.

           राज्‍य शासनाच्‍या आदेशाने शिर्डी येथील श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले असून दिनांक १६ नोव्‍हेंबर ते दिनांक २७ नोव्‍हेंबर २०२० याकालावधीत ९१ हजार १३६ साईभक्‍तांनी श्रीं च्‍या दर्शनाचा लाभ घेतला. तर याकाळात श्री साईप्रसादालयामध्‍ये सुमारे ०१ लाख १० हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज […]

अहमदनगर जिल्ह्यात आज ३४० रुग्णांना डिस्चार्ज तर ३०९ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२०, रोजी सायंकाळी ६-३० वाजेपर्यंत ३४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ९८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

राहुरी तालुक्यात शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत कुक्कुटपालनावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

           महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत कार्यरत असलेला शेतकरी प्रथम प्रकल्प व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे व कणगर या गावात या आठवड्यामध्ये तीन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.            यामध्ये चिंचविहिरे येथे दि.२३ नोव्हेंबर २०२० रोजी पशुविज्ञान व दुग्धशास्त्र […]

नागरिकांच्या तक्रारीचा मार्गी न लागल्यामुळे शास्ती माफीच्या मुदतीत वाढ करावी:- उपमहापौर सौ मालनताई ढोणे

           अहमदनगर महापालिकेने १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यत विविध कारचा एक रकमी भरणा केल्यास ७५ % शास्ती माफी लाभ देण्याबाबततचा निर्णय जाहिर केलेला आहे. या निर्णयास शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिला असून ते करांचा भरणा करीत आहेत.           नागरिकांनी अनेक वर्षापासून घरपटटी बाबत तक्रार अर्ज दिलेले आहेत. ज्यात प्रामुख्याने घरपटटीची फाळणी करणे, नळ कनेक्शन नसतांनाही नळपटटीची […]

अहमदनगर जिल्ह्यात आज २६० रुग्णांना डिस्चार्ज तर ३३८ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२०, रोजी सायंकाळी ६-३० वाजेपर्यंत २६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ६४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]

अहमदनगर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा.

           आज अहमदनगर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संविधानाच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. तसेच 26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्लयातील शहिद जवान व पोलिसांना हुतात्मा स्मारक येथे श्रध्दांजली वाहण्यात आली.           यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. अशोक डोंगरे यांनी सांगितले की, ‘घटनाकार डॉ.बाबासाहेब […]

जि.प.कर्मचारी महासंघाची नगरमध्ये निदर्शने, देशव्यापी संपाला पाठिंबा.

           अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने आज गुरुवारी महासंघाने जि.प.च्या आवारात निदर्शने करून सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात सहभाग नोंदवला तसेच याप्रश्नी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.            करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, तसेच खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर सरकारी कर्मचारी नाराज झाले आहेत. आर्थिक सेवा व […]

मनसेचा वीज बिल वाढी विरोधात मोर्चा

           आज नगर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने वीज बिल वाढीसंदर्भात आंदोलन करण्यात आले, नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला. यात नागरिकांनसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.            याप्रसंगी अनिल चितळे म्हणाले, ‘एप्रिल महिन्यांपासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले, व्यवसायांना घरघर लागली. अनेकांनी नोकर्‍या गमवाव्या लागल्या एका बाजूला आजाराची भीती आणि […]

जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी घेतला आरोग्य विभागाच्या योजनांचा तपशीलवार आढावा.

           अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी, विविध योजनांची अंमलबजावणी योग्य रितीने करणे तसेच इतर आरोग्य यंत्रणांशी संबंधित विषयांसंदर्भात आज २६ नोहेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या सोबत आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जि.प.चे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, […]

१६ ते २४ नोव्‍हेंबर २०२० या कालावधीत शिर्डी संस्थानला ०३ कोटी ०९ लाख ८३ हजार १४८ रुपये देणगी प्राप्‍त.

           राज्‍य शासनाच्‍या आदेशाने श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले असून दिनांक १६ नोव्‍हेंबर ते दिनांक २४ नोव्‍हेंबर २०२० याकालावधीत सुमारे ४८ हजार २२४ साईभक्‍तांनी श्रीं च्‍या दर्शनाचा लाभ घेतला. तर याकाळात साईभक्‍तांकडून विविध प्रकारे ०३ कोटी ०९ लाख ८३ हजार १४८ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे.           सध्‍या कोरोना विषाणु (कोवीड […]