अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२०, रोजी सायंकाळी ६-३० वाजेपर्यंत २६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ६४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३३८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८१३ इतकी झाली आहे.
           जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०८ आणि अँटीजेन चाचणीत १६७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ०२, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०३, पाथर्डी ०४, रहाता १०, राहुरी ०१, संगमनेर ०८, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०२, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २९, अकोले ०८, जामखेड ०१, कर्जत ०६, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०८, पारनेर ०२, पाथर्डी ०३, राहाता १२, राहुरी ०३, संगमनेर १९, शेवगाव ०३, श्रीरामपूर ०४ आणि कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १६७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०६, अकोले १९, जामखेड ०४, कर्जत ९, कोपरगाव ०६, नेवासा २१, पारनेर ०५, पाथर्डी १६, राहाता १८, राहुरी ०७, संगमनेर २३, शेवगाव ११, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३८, अकोले २२, जामखेड ०८, कर्जत १२, कोपरगाव १०, नगर ग्रा.२५, नेवासा ११, पारनेर १२, पाथर्डी १४, राहाता ३२, राहुरी १५, संगमनेर ४२, शेवगाव ०८, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०६ आणि कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

   बरे झालेली रुग्ण संख्या: ५९६४३
   उपचार सुरू असलेले रूग्ण: १८१३
   मृत्यू: ९२६
   एकूण रूग्ण संख्या: ६२३८२

   (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)