अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने आज गुरुवारी महासंघाने जि.प.च्या आवारात निदर्शने करून सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात सहभाग नोंदवला तसेच याप्रश्नी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.
           करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, तसेच खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर सरकारी कर्मचारी नाराज झाले आहेत. आर्थिक सेवा व हक्क विषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने विविध मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटनांनी आज संप पुकारला होता. या संपात अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने सहभाग घेतला.
           यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, जि.प.कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल नागरे, अशोक काळापहाड, सागर आगरकर, अशोक नरसाळे, मंगेश पुंड, मीना काळेकर, कल्पना महाडिक, मंदा माने, राजेंद्र पावसे, युवराज पाटील, रवींद्र ताजणे, सुरेश मंडलिक आदी उपस्थित होते. ग्रामसेवक संघटना, नर्सेस संघटना, परिचर संघटना, कृषी संघटना, अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटना, आरोग्य संघटना, विस्तार अधिकारी संघटना, अर्धवेळ परिचर संघटना, पशुवैद्यकीय आदी प्रवर्गाच्या संघटनांचे सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते.