अहमदनगर जिल्ह्यात आज ८७५ रुग्णांना डिस्चार्ज तर ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.६९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
प्रा. ह.भ.प. ज्ञानेश्वर मच्छिंद्र भोसले यांची क्षत्रिय मराठा संघटनेचे अहमदनगर जिल्हाअध्यक्ष म्हणुन निवड.
अहमदनगर चे प्रा. ह.भ.प. ज्ञानेश्वर मच्छिंद्र भोसले यांची अहमदनगर चे क्षत्रिय मराठा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली आहे. चे प्रा. ह.भ.प. ज्ञानेश्वर मच्छिंद्र भोसले हे अध्यात्मिक वारसा असलेले व विद्यार्थ्याना अनेक वर्षापासून ज्ञानदान करणारे असे कर्तव्य निष्ठ म्हणुन ओळख असणारे शिक्षक असुन ते वारकरी संप्रदायाचे शिष्य आहेत. आपल्या प्रबोधनातून कायम ते युवकांना प्रेरित करत […]
भाकप, अ.भा. किसान सभा व डावे पक्षांच्या वतीने शेतकरी व कामगार विधेयकांच्या निषेधार्थ निदर्शने.
केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी आज भारत बंदला प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अ.भा. किसान सभा व डावे पक्षांच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केले. तसेच नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास […]
अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादी व शिवसेनचे मनोमिलन, अखेर राष्ट्रवादीचे कोतकर ‘स्थायी’चे सभापती.
अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अखेर राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची निवड झाली. वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानुसार अखेर शिवसेनेनेचे उमेदवार मा. योगीराज गाडे यांनी आपला अर्ज माघारी घेतला. यामुळे राष्ट्रवादीचे मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली. आज जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल […]
कोरोनाच्या काळातही स्वयंभू प्रतिष्ठाणने घडवून आणले भव्य रक्तदान शिबीर.
कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या काळातही स्वयंभू युवा प्रतिष्ठाणने सरकारचे नियम पाळत रक्तदान शिबिर घडवून आणले. स्वयंभू प्रतिष्ठाणने आजवर अनेकदा रक्तदानाचे महत्व समजून घेत नगर जिल्ह्यात रक्तसाखळी मोहीम राबविली आहे. सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्याने रक्ताची गरज भासत असल्याचे चित्र होते.त्यामुळे समाजाच्या आरोग्य सेवेसाठी स्वयंभू प्रतिष्ठाणच्या वतीने काम करण्याची ही सर्वात मोठी संधी […]
प्रदेश भाजपात कोणतेही मतभेद नाहीत, भाजपा हा एकसंघ आहे- मा. विनोद तावडे
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा फेटाळून लावली.’प्रदेश भाजपात कोणतेही मतभेद नाहीत,‘भाजपा हा एक संघ आहे. भाजपा मध्ये कुठलीही फळी नाही. राज्यात तसं कुठलंही वातावरण नाही, असं मत […]
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित नगर शहर भाजपा तर्फे वृक्षारोपण.
आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती असून त्या निमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर भारतीय जनता पार्टी, नगर शहरच्या वतीने सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक येथे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री मा. श्री. विनोद तावडे., प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री तथा […]
अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत ७७८ बाधितांची भर.
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २४ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४,७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी ६.०० वाजले पासून आज सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७७८ ने वाढ झाली. […]
दौंड तालुक्यातील पाटसचे कोविड सेंटर ठरत आहे रुग्णांचे आधार केंद्र.
दौंड तालुक्यातील पाटस येथील नागेश्वर विद्यालयात पाटसकरांच्या पुढाकाराने शासनमान्य कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहे. यात पन्नास बेड सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात सकाळी योग अभ्यास झाल्यानंतर प्रशासनाकडून सर्व रुग्णांना पौष्टिक व योग्य आहार वेळचे वेळी दिला जातो. या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांची पाटसकरांनी विशेष काळजी घेत आहेत. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर […]
मा. आ. अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन.
शिवसेनेचे उपनेते मा.आ.धर्मवीर अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे. नगर मधील बुरूडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे ही सभा होणार आहे. रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० ते २.०० या वेळेत ही सभा होईल. राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख […]