अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.६९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७९० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४३४१ इतकी झाली आहे.
           जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२३ आणि अँटीजेन चाचणीत ४१९ रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७०, संगमनेर ०३, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण ०९, श्रीरामपूर ०२, नेवासा १२, अकोले १७, राहुरी ०१, शेवगाव ०३, कोपरगाव ०६, कर्जत ०५, मिलिटरी हॉस्पिटल १५ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ७७, संगमनेर १६, राहाता १५, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण २६, श्रीरामपुर १८, नेवासा १५, श्रीगोंदा ०३, पारनेर १८, अकोले ०२, राहुरी १९, शेवगाव ०२, कोपरगाव ०१, जामखेड ०६ आणि कर्जत ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.अँटीजेन चाचणीत आज ४१९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १७, संगमनेर ७९, राहाता २७, पाथर्डी ४८, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपूर २१, कॅंटोन्मेंट ०६, नेवासा ०६, श्रीगोंदा २२, पारनेर १९, अकोले ४१, राहुरी १८, शेवगाव १२, कोपरगाव २८, जामखेड ३० आणि कर्जत ३९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           दरम्यान, आज ८७५ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २२२, संगमनेर २४, राहाता ७६, पाथर्डी ५०, नगर ग्रा. ५४, श्रीरामपूर ४१, कॅन्टोन्मेंट ०७, नेवासा ८१, श्रीगोंदा ३२, पारनेर ३४, अकोले ४६, राहुरी ४३, शेवगाव ८४, कोपरगाव ३७, जामखेड २४,कर्जत १७, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

   बरे झालेली रुग्ण संख्या: ३५६४४
   उपचार सुरू असलेले रूग्ण: ४३४१
   मृत्यू: ६६५
   एकूण रूग्ण संख्या: ४०६५०

   (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आणखी बातम्या

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित नगर शहर भाजपा तर्फे वृक्षारोपण.

प्रदेश भाजपात कोणतेही मतभेद नाहीत, भाजपा हा एकसंघ आहे- मा. विनोद तावडे

कोरोनाच्या काळातही स्वयंभू प्रतिष्ठाणने घडवून आणले भव्य रक्तदान शिबीर.

भाकप, अ.भा. किसान सभा व डावे पक्षांच्या वतीने शेतकरी व कामगार विधेयकांच्या निषेधार्थ निदर्शने.