अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक २४ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वाजेपर्यंत ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४,७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी ६.०० वाजले पासून आज सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७७८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४४३५ इतकी झाली आहे.
           जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २९० आणि अँटीजेन चाचणीत ३५७ रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७०, संगमनेर ०१, राहाता ०७, पाथर्डी ०१, श्रीरामपूर २०, कॅंटोन्मेंट ०५, नेवासा ०८, श्रीगोंदा ०९, पारनेर ०२, राहुरी ०२, कोपरगाव ०१, जामखेड ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २९० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १०७, संगमनेर ०४, राहाता ०७, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण ०७, श्रीरामपुर ३७, कॅंटोन्मेंट १४, नेवासा १०, श्रीगोंदा ०७, पारनेर १७, अकोले ३१, राहुरी ०९, शेवगाव १३, कोपरगाव १२, जामखेड १० आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३५७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २४, संगमनेर १६, राहाता २८, पाथर्डी १३, नगर ग्रामीण २०, श्रीरामपूर ०९, कॅंटोन्मेंट २१, नेवासा १०, श्रीगोंदा २३, पारनेर ५२, अकोले २३, राहुरी ३२, शेवगाव ३६, कोपरगाव २५, जामखेड २४ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           दरम्यान, आज ६४४ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १४४, संगमनेर २०, राहाता ४४, पाथर्डी ११, नगर ग्रा. १६, श्रीरामपूर ४१, कॅन्टोन्मेंट १७, नेवासा २३, श्रीगोंदा ३५, पारनेर ३७, अकोले ९८, राहुरी ३४, शेवगाव ४२, कोपरगाव ३२, जामखेड ३४,कर्जत ०६, मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

   बरे झालेली रुग्ण संख्या: ३४७६९
   उपचार सुरू असलेले रूग्ण: ४४३५
   मृत्यू: ६५६
   एकूण रूग्ण संख्या: ३९८६०

   (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आणखी बातम्या

अहमदनगर येथील के के रेंज येथे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राचे सफल परीक्षण.

मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय.

विविध प्रश्नी मा. आ. रोहित पवार यांनी घेतल्या मंत्र्यांच्या भेटी.

मा. आ. अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन.