राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा.

           आज दि. ७ ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यात पुढील निर्णय घेण्यात आले.            पर्यटन विभाग                     राज्यात हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य क्षेत्रासाठी क्रांतिकारी निर्णय पर्यटन विभागाने घेतला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे आदरातिथ्य उद्योग सुरू करण्यासाठी ७० परवानग्यांऐवजी आता १० परवानग्या तसेच ९ स्वयं प्रमाणपत्रे […]

चिंता वाढली आज अहमदनगर जिल्ह्यात १०३८ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ६१७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ४९७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०३८ […]

आज अहमदनगर जिल्ह्यात ४१६ रुग्णांना डिस्चार्ज तर ४५२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ४५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५२ […]

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम तालुकास्तरीय यंत्रणांनी गतिमानतेने काम करण्याची गरज- जिल्हाधिकारी

           कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यातील सदस्यांची कोरोनादूत तपासणी करत आहेत. मात्र, ही मोहिम प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणांनी अधिक गतिमानतेने राबविण्याची गरज आहे. त्याचबरोबर, सर्वेक्षणाची माहिती लगेचच पोर्टलवर अपलोड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदि यांनी दिल्या आहेत. […]

मराठा महिला पदाधिकारी यांचे नगर येथे तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन.

           मराठा समाजाच्या अरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने नगर तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन दिले. मराठा क्रांती मोर्चाच्या महिला आघाडी केंद्र व राज्य सरकारकडे अनेक दिवसांपासून आरक्षण तसेच इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी शांततेच्या व संयमाच्या मार्गाने पाठपुरावा करीत आहे. मात्र अद्याप […]

केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणे गरजेचे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

          केंद्र सरकारने नुकतेच शेतीशी संबंधित तीन कायदे केले आहेत. यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचे आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत विचारविनिमय केला जाईल असे सांगून शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.           शेती व पणनसंबंधी केंद्र सरकारच्या कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करणेबाबत विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी […]

नगर शहर शिवसेनेतील एकोप्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री यांना पाठवले पत्र.

           नगर शिवसेनेतील हे गटातटाचे राजकारण मिटावे, यासाठी युवासेनेचे शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला भाजप-राष्ट्रवादीच्या राजकारणामुळे सत्तेपासून दूर राहावे लागले, हे स्पष्ट केले आहे. तसेच शिवसेनेला महापालिकेत विरोधी पक्षनेते पद मिळाले नाही. मनपा स्थायी समितीचे […]

आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

           अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत १०३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ४६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.६२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७५३ […]

राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची मा. आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी.

           शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील रस्त्यावर पावसाळ्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला होता. मागील आठवड्यामध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांस मा.आमदार संग्राम जगताप सूचना देऊन राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज नगर शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.           तसेच राज्य महामार्गावरील रस्ते बांधकाम […]

खराब झालेल्या काटवन खंडोबा रस्त्याला मनसेने दिले खासदारांचे नाव.

          महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने वारंवार मागणी करुनही काटवन खंडोबा रोडची दुरुस्ती होत नसल्यामुळे या रस्त्याच्या खराब झालेल्या परिस्थितला खासदार सुजय विखे हेच जबाबदार असल्यामुळे या खराब रस्त्याचे ‘खासदार मार्ग’ असे नामकरण मनसेच्यावतीने सचिव नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी रस्त्यातील खड्डयांची पूजा करुन निषेध नोंदविण्यात आला.           यावेळी नितीन भुतारे म्हणाले, गेल्या वर्षापासून सदर रोडला […]