नगर शिवसेनेतील हे गटातटाचे राजकारण मिटावे, यासाठी युवासेनेचे शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला भाजप-राष्ट्रवादीच्या राजकारणामुळे सत्तेपासून दूर राहावे लागले, हे स्पष्ट केले आहे. तसेच शिवसेनेला महापालिकेत विरोधी पक्षनेते पद मिळाले नाही. मनपा स्थायी समितीचे सभापतीपद सुद्धा शिवसेनेला मिळाले नाही, असे म्हंटले आहे. तसेच काही वर्षापासून शिवसेनेत अंतर्गत गटातटाचे राजकारण सुरू झाल्याने शिवसेनेची ताकद विखुरली जात आहे. याचा फायदा विरोधक उठवत आहेत. आजही महापालिकेत शिवसेनेचे २३ नगरसेवक आहेत.
          नगरमध्ये उपनेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. याचा फटका सामान्य शिवसैनिकांना पर्यायाने शिवसेनेला बसत आहे. नगरमध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे. परंतु, गटातटाच्या राजकारणामुळे कट्टर शिवसैनिक दुखावला जात आहे. भविष्यातही असेच गटातटाचे राजकारण सुरू राहिल्यास शिवसेनेला याची मोठी किंमत मोजावी लागेल.त्यामुळे नगर शहरातील गटातटाच्या राजकारणातील दुफळी रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली कराव्यात असे पत्रात नमुद केले आहे.

आणखी बातम्या

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिम तालुकास्तरीय यंत्रणांनी गतिमानतेने काम करण्याची गरज- जिल्हाधिकारी

मराठा महिला पदाधिकारी यांचे नगर येथे तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन.

केंद्राच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणे गरजेचे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री.प्रवीणजी दरेकर यांची सदिच्छा भेट.