शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील रस्त्यावर पावसाळ्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला होता. मागील आठवड्यामध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांस मा.आमदार संग्राम जगताप सूचना देऊन राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज नगर शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
          तसेच राज्य महामार्गावरील रस्ते बांधकाम विभागाने लक्ष ठेवून चांगल्या दर्जाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करुन खड्डे बुजवावेत. तसेच पुन्हा पुन्हा तेच काम करायची वेळ आणू नये, अशाप्रकारे सूचना नगर शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी करताना मा. आमदार संग्राम जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
          नगर शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी करताना समवेत युवक कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष ढाकणे, माऊली जाधव, जॉय लोखंडे आदी उपस्थित होते.

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल.

ओळख कायद्याची – कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा २००५.

भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी.