महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने वारंवार मागणी करुनही काटवन खंडोबा रोडची दुरुस्ती होत नसल्यामुळे या रस्त्याच्या खराब झालेल्या परिस्थितला खासदार सुजय विखे हेच जबाबदार असल्यामुळे या खराब रस्त्याचे ‘खासदार मार्ग’ असे नामकरण मनसेच्यावतीने सचिव नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी रस्त्यातील खड्डयांची पूजा करुन निषेध नोंदविण्यात आला.
          यावेळी नितीन भुतारे म्हणाले, गेल्या वर्षापासून सदर रोडला निधी देणार असे पत्र खासदार सुजय विखे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे दिले. परंतु आजपर्यंत खासदार सुजय विखे यांनी कुठलाही निधी या रोड करीता दिलेला नसुन उलट दलित वस्ती निधीतून हा रोड दुरुस्ती होणार होता. त्या कामाची मंजुरी ३१/१०/२०२० रोजी देण्यात आली होती परंतु स्थनिक शिवसेना नगरसेवकांनी हे काम उपायुक्तांवर दबाव आणून ०९/०९/२०१९ रोजी पत्र देऊन बंद पाडले व खासदार या रोड ला निधी देणार होते परंतु खासदार यांचे पत्र २३/०८/२०१९ महानगरपालिका आयुक्तांना प्राप्त झाले. शिवसेनेच्या ४ नगरसेवकांच्या अंतर्गत गटबाजीमुळे हा रोड थांबल्यामुळे या भगातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने आज ‘खासदार मार्ग’ असे नामकरण करून आंदोलन करावे लागले.
          हा रस्ता खासदार निधीतून करावा किंवा दलित वस्ती निधीतून करावा हा महानगर पालिकेचा प्रश्‍न असून महानगरपालिका आयुक्तांनी हा काटवन खंडोबा रोडचे काम ताबडतोब मार्गी लावावे, अन्यथा मनसेच्या वतीने नवीन टिळक रोड ते नेप्ती नका चौकापर्यंतच्या रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नितीन भुतारे यांनी दिला आहे.
          याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, अ‍ॅड.अनिता दिघे, विनोद काकडे, पोपट पाथरे, मनोज राऊत, अमोल बोरुडे, गणेश शिंदे, विक्रम गायकवाड आदि उपस्थित होते.

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल.

ओळख कायद्याची – कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा २००५.

भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी.