सक्षम पिढी घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचा सेंट्रल बँकेला अभिमान – क्षेत्रीय प्रबंधक श्री एन. के. पंडा
नगर – भारतीय संस्कृतीत गुरु शिष्यांची समृद्ध परंपरा आहे. विद्यार्थ्यांना गुणवंत, ज्ञानवंत, चारित्र्यसंपन्न बनवून देशासाठी सक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. त्या सर्व गुरुजनांचा सेंट्रल बँकेला अभिमान आहे. म्हणूनच नगर मधील जेष्ठ शिक्षकांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला आहे, असे गौरवोद्गार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक श्री […]
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश – महामार्गाच्या कामाकरीता केंद्र सरकारचा निधी मंजुर
न्हावरा, काष्टी, श्रीगोंदा, आढळगांव ते जामखेड या ५४८ डी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरीता खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारने २१६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे. अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील तळेगाव पासुन चाकण, शिक्रापूर, न्हावरा, काष्टी, श्रीगोंदा, माहिजळगाव, जामखेड, बीड अशा मोठ्या शहरांना जोडणारा ५४८ डी या राष्ट्रीय महामार्गाची ओळख आहे. […]
अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४४ टक्के
अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक: ०६ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत […]
त्रिमुर्तींनी कोविड सेंटरची उभारणी केली – प्रांत संघचालक नानासाहेब जाधव
“मनपा, भाजप व दीनदयाळ पतसंस्था या त्रिमुर्तींनी कोविड सेंटरची उभारणी केली आहे. यातून चांगले कार्य निश्चितच होईल. भाजपने आता घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती व प्राथमिक तपासण्यासाठी पुढाकार घ्यावा” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव यांनी केले. महापालिका, नगर शहर भाजप व पंडीत दिनदयाळ पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने नटराज कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. तर, माजी मंत्री […]
अहमदनगर जिल्ह्यात २१ हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन परतले घरी
अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८९९ ने वाढ झाली. यामुळे उपचार […]
शिक्षक नारायण मंगलाराम यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव
अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी (ता. राहुरी) जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे हस्ते श्री. मंगलाराम यांनी अहमदनगर येथे हे सन्मानपत्र स्वीकारले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोवीड19 च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2020’ चे वितरण […]
‘मुळा’सह ‘या’ धरणांमधून विसर्ग सुरू
नगर जिल्ह्यातील मुळा धरणासह भंडारदरा, ओझर व निळवंडे या धरणांमधून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. या धरणातून सोडण्यात आलेले पाणी हे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे जाते. प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या मुळा, गोदावरी, प्रवरा, भीमा, घोड या नद्यांमध्ये विविध धरणांमधून विसर्ग सुरू आहे. आज सायंकाळी सहा वाजताची आकडेवारी विचारात घेतल्यास त्यानुसार मुळा नदीत मुळा धरणातून […]