नगर जिल्ह्यातील मुळा धरणासह भंडारदरा, ओझर व निळवंडे या धरणांमधून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. या धरणातून सोडण्यात आलेले पाणी हे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे जाते.

प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या मुळा, गोदावरी, प्रवरा, भीमा, घोड या नद्यांमध्ये विविध धरणांमधून विसर्ग सुरू आहे. आज सायंकाळी सहा वाजताची आकडेवारी विचारात घेतल्यास त्यानुसार मुळा नदीत मुळा धरणातून २ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रवरा नदीपात्रात भंडारदरा धरणातून ८१२ क्युसेक, निळवंडे धरणातून ७१० क्युसेक व ओझर बंधारा येथून १ हजार ९३ क्युसेक वेगाने पाण्याचाविसर्ग सुरू आहे. नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत ४ हजार ३०५ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. तर, मराठवाड्यातील जायकवाडी धऱणातून गोदावरी ६३७ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. भीमा नदीत दौंड पूल येथून ४ हजार ३४० क्युसेक वेगाने, घोड नदीत घोड धरणातून २ हजार १५ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.