राज्य सरकार हे प्रशासनाच्या भरवशावर सुरू – माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
‘आपल्या जिल्ह्यातील तीन सुपूत्र हे मंत्री आहेत. ते काय करतात, हे त्यांना जिल्ह्यातील लोकांनी विचारले पाहिजे. हे मंत्री आतापर्यंत कुठे कोविड सेंटर सुरू करू शकले नाहीत. जिल्ह्यात जो करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यावर ते काही भाष्य करतात, उपाययोजना करतात हे पाहण्यास मिळत नाही. आज बारामतीत जनता कर्फ्यु आहे. स्वतः पालकमंत्र्यांच्या कागलमध्ये लॉकडाउन […]
शिक्षक नारायण मंगलाराम यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव
अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी (ता. राहुरी) जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे हस्ते श्री. मंगलाराम यांनी अहमदनगर येथे हे सन्मानपत्र स्वीकारले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोवीड19 च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2020’ चे वितरण […]
‘मुळा’सह ‘या’ धरणांमधून विसर्ग सुरू
नगर जिल्ह्यातील मुळा धरणासह भंडारदरा, ओझर व निळवंडे या धरणांमधून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. या धरणातून सोडण्यात आलेले पाणी हे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे जाते. प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या मुळा, गोदावरी, प्रवरा, भीमा, घोड या नद्यांमध्ये विविध धरणांमधून विसर्ग सुरू आहे. आज सायंकाळी सहा वाजताची आकडेवारी विचारात घेतल्यास त्यानुसार मुळा नदीत मुळा धरणातून […]