ब्युरो टीम :  पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे येथील प्रा. दिपाली निलेश नाईक यांना नुकतीच सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथून “डेव्हलपमेंट ऑफ सिस्टिम फॉर प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस अँड रेमेडिएशन फॉर आय. टी इन्फ्रास्ट्रक्चर” या विषयावर कंप्युटर इंजिनिअरींग क्षेत्रातील पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली. सदर अभ्यासक्रमात त्यांना डॉ. अंबिका पवार, पर्सिस्टंट सिस्टम्स, पुणे यांचे मार्गदर्शन लाभले. 

डॉ. दिपाली निलेश नाईक यांच्या या विषयावरील जर्नल्समध्ये, एकूण ७ शोधनिबंध, २ एस.सी.आय.ई इंडेक्स आणि ५ स्कोपस इंडेक्स प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या संशोधनामुळे “आय टी इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटरिंग अँड रेमेडिएशन” क्षेत्रात भरीव योगदान मिळेल. या विषयीचे पेटंट करण्याचा डॉ. दिपाली यांचा मानस आहे. 

डॉ. दिपाली निलेश नाईक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्या हरिश्चंद्र जयराम नाईक, कोल्हार भगवतीपूर यांच्या सून तर अरुण सदाशिव भणगे, कर्जत यांच्या कन्या आहेत.  नगरमधील सावेडी भागातील भिस्तबाग चौकातील अरुणोदय औषधालयचे संचालक  उदयकुमार अरुण भणगे यांच्या त्या बहिण आहेत. त्यांचे प्राथमिक व इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण श्री. अमरनाथ विद्यालय कर्जत, जि. अ. नगर येथे झाले. पुढील ११ वी १२ वी चे शिक्षण हे महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज, कर्जत, जि. अ. नगर येथे झाले. पुढील शिक्षण लोणावळा येथील सिंहगड कॉलेज ओफ इंजिनिअरींग येथे झाले

कोल्हार भगवतीपुर आणि कर्जत येथील गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. दिपाली यांच्या यशाबद्दल पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

मा. खा. श्री. सुजयदादा विखे पाटील व मा. आ. प्रा. श्री. रामभाऊ शिंदे आणि प्रांत संघचालक मा. श्री. नानासाहेब जाधव व कर्जत‌ तालुका संघचालक मा. श्री. गजानन चावरे सर यांनी तीचे अभिनंदन केले.