अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०८ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ३६१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ८५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८२० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४५५० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६१ आणि अँटीजेन चाचणीत ३२९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६, अकोले १८, जामखेड ०६, कर्जत ०२, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०५, पारनेर ०७, पाथर्डी १४, राहाता ०४, संगमनेर ०३, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०३, मिलिटरी हॉस्पिटल १६, इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३६१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५५, अकोले ३५, जामखेड ०६, कर्जत ०२, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण १७,, नेवासा १२, पारनेर ०६, पाथर्डी ०७, राहाता ३५, राहुरी २२, संगमनेर १३६, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३२९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ४३, अकोले १३, जामखेड २५, कर्जत २५, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण ०३, नेवासा १९, पारनेर १४, पाथर्डी ३८, राहाता २१, राहुरी ३७, संगमनेर २६, शेवगाव २२, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर १५, कॅन्टोन्मेंट ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ६०, अकोले ११, जामखेड २७, कर्जत २३, कोपरगाव ०२, नगर ग्रा. ४६, नेवासा ०५, पारनेर १०, पाथर्डी २२, राहाता २६, राहुरी ४३, संगमनेर ३५, शेवगाव २२, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या: ४३८५८ उपचार सुरू असलेले रूग्ण: ४५५० मृत्यू: ७५९ एकूण रूग्ण संख्या: ४९१६७
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
|