आज अहमदनगर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संविधानाच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. तसेच 26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्लयातील शहिद जवान व पोलिसांना हुतात्मा स्मारक येथे श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. अशोक डोंगरे यांनी सांगितले की, ‘घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली. राजेशाही संपुष्टात येऊन सर्वसामान्य मतदारांच्या हातात देशाची सुत्रे आली. मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र सध्या देशात हुकूमशाही पध्दतीने सरकार आपला कारभार करीत आहे. परंतु आम आदमी पार्टी सत्तेसाठी कधी निष्ठा व विचारांशी तडजोड करीत नसल्याची भावना व्यक्त केली.’ पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, महिला शहर प्रमुख सुचिता शेळके, शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, सचिव दिलीप घुले, शकील शेख, रेव्ह. आश्विन शेळके आदी उपस्थित होते. |