पुणे, दि. १ :- कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करुन त्या ऐतिहासिक लढाईतील वीरांच्या स्मृतींना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली. |
|
कोरेगाव भीमा जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या नागरिकांच्या भावनांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आदर व्यक्त केला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यंदा सर्वांनी आपापल्या घरुनच जयस्तंभाला व शूरवीरांना अभिवादन करावे. कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचना व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही श्री. अजित पवार यांनी केले आहे |