ब्युरो टीम : प. पु. माताजी श्री निर्मलादेवी प्रणित सहजयोग परिवाराच्या वतीने सहजयोगी भक्ती संजय संभार व द्यावनपेल्ली यांनी इन्स्टिटयूट ऑफ चार्टड अकौंटन्टस च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
या वेळी अहमदनगर जिल्हा सहजयोग समन्वयक श्रीनिवास बोज्जा, राज्य सदस्य अंबादास येन्नम, जेष्ठ नागरिक प्रा. अशोक काळे काका, मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा, डॉ. लक्ष्मीकांत पारगावकर,राजेंद्र द्यावनपेल्ली तसेच भक्ती संभार हिचे आई वडील व दीपा द्यावनपेल्ली हिचे आई वडील व सहजयोग परिवारातील सदस्य उपस्थित होते.
या वेळी बोलतांना मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा म्हणाले सहजयोग ध्यान साधनेमूळ मुलामध्ये एकाग्रता वाढून स्मरणशक्ती वाढते, याचा उपयोग भक्ती हिला नक्कीच झाला आहे. कोणतेही क्षेत्र असो प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. या वेळी जेष्ठ नागरिक काळे काकांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, सहजयोग ध्यान साधना नित्य नियमाने करणे काळाची गरज आहे. ध्यान साधनेमुळे नक्कीच माणूस निरोगी राहू शकतो.
कार्यक्रमाचे स्वागत सेंटर प्रमुख राजेंद्र द्यावनपेल्ली यांनी केले तर आभार अभय ठेंगणे यांनी मानले. या वेळी सहजयोगी जयश्री सामलेटी, वासंती वैद्य, कोडम अक्का, पंतम वहिनी, मयूर थिगळे, मंचे वहिनी, क्यादर वहिनी, श्रीमती बुरा आदी उपस्थित होते.