ब्युरो टीम : ‘महाविजय-2024’ या अभियानाअंतर्गत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात दौरा केला. या दौऱ्यात अकलूज येथे माळशिरस मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व भाजपा सुपर वॉरियर्स यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी उपस्थित राहून महाविजयाच्या या संकल्पात मी देखील सहभाग नोंदवला.
यावेळी मा. बावनकुळे साहेबांचे अनमोल मार्गदर्शन सर्वांना लाभले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेला देशाचा विकास आणि कायापालट जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली आणि यासाठी सर्वांनी मेहनत घेण्याचे आवाहन केले. तसेच लोकसभा निवडणूक, केंद्र सरकारच्या योजना, बूथ सशक्तीकरण, संघटना मजबुतीकरण असे विविध महत्त्वाचे मुद्दे देखील मा. प्रदेशाध्यक्षांनी मांडले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस श्री. मुरलीधर मोहोळ, श्री. विक्रांत पाटील, खा. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, धैर्यशील कदम, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, आ. जयकुमार गोरे, आ. प्रशांत परिचारक, श्री. लक्ष्मणराव ढोबळे, श्री. मकरंद देशपांडे, श्री. धैर्यशील मोहिते-पाटील, श्री. राजकुमार पाटील, श्री. शशिकांत चव्हाण, श्री. जयकुमार शिंदे, श्री. बाजीराव काटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.