करोनाचे पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून 48 हजारांचा ऐवज लुटला याबाबत मिळालेली माहिती नेवासा ते शेवगाव कडे बस जात असताना नेवासा फाटा येथे फिर्यादी ह्या बसमधून उतरली. तसेच बस मधून पंचवीस ते तीस वर्षे वयाचा एक इसम देखील उतरला व फिर्यादीस म्हणाला मी तुम्हाला करोनाचे ७००० रुपये मिळवून देतो. असे म्हणून फिर्यादी व तिच्या मैत्रिणी सह आंबेडकर चौकामध्ये नेवासा फाटा येथे घेऊन आला. आरोपी फिर्यादीस म्हणाला की तुमचे दागिने तुमच्या जवळील पिशवी काढून ठेवा व तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स घेऊन या. फिर्यादी दागिन्याची पिशवी आपल्या मैत्रिणी कडे ठेऊन आधार कार्ड ची झेरॉक्स काढण्याची गेली असता, सदर इसम तिच्या मैत्रिणीला झेरॉक्ससाठी पैसे लागतात असे म्हणून पिशवी घेऊन पसार झाला..
यावरून नेवासा पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे दागिन्यांमध्ये एक तोळा वजनाचा मणी, कानातले पाच ग्रॅम वजनाची, पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठी असा ऐवज आहे. याची साधारण ४८००० रुपये आहे आंबेडकर चौक नेवासा फाटा ते हा गुन्हा घडला असून याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ठोंबरे हे करत आहेत
विदर्भातून विदेशात सहज होणार संत्र्याची निर्यात.
राज्य सरकारने राज्यातील सामान्य जनतेचे २४० कोटी रुपये परत द्यावे.
२० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची आजपर्यंतची प्रगती.