सध्या बर्ड फ्लू चा धोका वाढत असुन याचा फटका कोंबडी पालन व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. तरी बर्ड फ्लूची भीती मनातून जावी, यासाठी अहमदनगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निवासस्थानी चिकन थाळी आस्वाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले काही पोल्ट्री मालकांनी त्यांची भेट घेतली. जिल्ह्यामध्ये ३३४१ पोल्ट्री फार्म आहेत आणि बर्ड फ्लू मुळे काही पक्षी मरतुक झालेली आहेत, यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम असुन आपणास हि असा रोग होईल हि भीती आहे. पोल्ट्री फार्मस असोसियनच्या विनंती नुसार लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावी यासाठी ह्या यासाठी हे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोविड सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर हे देखील उपस्थित