कोरोना महामारीमुळे देश व देशाअंतर्गत व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणींला सामोरे जावे लागत आहे. त्या अंतर्गत सामाजिक, वैवाहिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना काही नियमांच्या आधीन राहून परवानगी देण्यात आली. परंतु त्यास पुरक असणारा साऊंड, लाईट, जनरेटर, मंडप ह्या व्यावसायिकांचा व्यवसाय अजून ठप्प आहे. यामुळे या सेवा देणारे लोक प्रभावित होऊन आर्थिक अडचणीत आहेत.
|
तसेच राज्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर, उडीद, सोयाबीन आदी खरीप पिकांचं नुकसान झालं. याबाबत पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत यासाठी कृषिमंत्री मा. दादासाहेब भुसे यांचीदेखील भेट मा. आ. रोहित पवार यांनी घेतली. त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलं आहे.
|
आणखी बातम्या अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत ९२३ बाधितांची भर. मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय. रस्ते तातडीने दुरूस्त करा, अन्यथा काळे फासण्यात येईल ! महापौर वाकळे यांचा इशारा. अहमदनगर येथील के के रेंज येथे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राचे सफल परीक्षण.’ |