काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगरला अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे आजार पसरत आहे. दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले असताना स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सदर प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना करुन नागरिकांना दिलासा देण्याच्या मागणीचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांना स्थानिक नागरिकांनी दिले. तर आमदार जगताप यांनी सदर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना घरात थांबणे देखील कठिण झाले असून, पाऊस आल्यानंतर काही नागरिकांच्या घरात देखील हे मैलमिश्रीत पाणी शिरत आहे. वारंवार मनपा प्रशानाला कळवून देखील हा प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांच्या संतप्त भावना आहेत. गाझीनगर भागात अनेक दिवसापासून ड्रेनेजलाईन तुंबली असून, ड्रेनेजच्या घाण पाण्याचे डबके साचले आहे. या भागात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. तर अस्वच्छता, दुर्गंधी व डासांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या नावाखाली मनपा सर्वसामान्यांच्या इतर आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असून, या भागात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ड्रेनेजलाईन दुरुस्त करण्यासाठी मनपा कर्मचारी येऊन गेले. मात्र मैलमिश्रीत पाणी उपसा करणार्या गाडीचा जेट अनेक दिवसापासून दुरुस्त नसल्याने काही करता येत नसल्याचे कर्मचार्यांचे म्हणने असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. महापालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असून, ड्रेनेजलाईन दुरुस्ती होण्यासाठी तातडीने उपाय योजना करुन गाझीनगर भागातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी आशा गायकवाड, हसीना शेख, समिना शेख, आयेशा बागवान, रेशमा बागवान, मनिषा शिंदे, हाजराबी शेख, नारायण दातरंगे, वसिम शेख, खलिल शेख, नजीर पठाण, शाहीन शेख, फरीदा शेख आदिंसह स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. |