“अयोध्येत आता प्रत्यक्ष प्रभूराम मंदिराचे काम सुरु होत झाले. ही बातमी ताजी असतांना सर्व नेत्यांना सीबीआय विशेष न्यायालयाने निर्दोष सोडल्याची दुसरी आनंदाची बातमी आज मिळाली आहे. त्यामुळे राम मंदिरासाठी गेल्या २७ वर्षापासूनचा संघर्ष आता पूर्ण होत आहे. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भारतात हे आंदोलन भाजपने सुरु केले होते. यात नगरहून मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्व कारसेवकांवर व नेत्यांवर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे सर्व जनता व्यथित झाली होती. आज सर्वांना निर्दोष सोडण्यात आल्याने ही व्यथा दूर झाली आहे. आजचा निकाल हा प्रभूरामावर असलेल्या श्रद्धेचा विजय आहे. म्हणून आजचा दिवस माझ्या आयुष्यातील आनंदाचा आहे. ज्यांनी ज्यांनी या आंदोलनात भाग घेऊन प्रभूरामाचे कार्य केले त्यासर्व नेत्यांचे व कारसेकांचे अभिनंदन” असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले. |
आणखी बातम्या
बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपी विशेष सीबीआय न्यायालयातून निर्दोष मुक्त. सुखकर्ता कॉलनी, सावेडी येथील नागरिकांचे विविध समस्यांबाबत नगरसेविका यांना निवेदन. हाथरस की घटना के बाद सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई ने युपी सरकार पर साधा निशाणा. आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज. |