अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक ०२ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री ७.०० वाजेपर्यंत ७५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ३१७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५९७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९८२ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११० आणि अँटीजेन चाचणीत ४१४ रुग्ण बाधीत आढळले.जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०,अकोले ०५, जामखेड ०६, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०५, पारनेर ०२, राहुरी ०१, शेवगाव ०१, श्रीगोंदा १५, कॅंटोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल १५ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ११० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ४२,अकोले ०२, जामखेड ०६, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १४, नेवासा ०५, पारनेर ०८, पाथर्डी ०६, राहाता ०५, राहुरी ०५, संगमनेर ०९, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ४१४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ३१, अकोले १५, जामखेड ५१, कर्जत ४०, कोपरगाव १२, नगर ग्रामीण २२, नेवासा ३५, पारनेर २८, पाथर्डी ३३, राहाता १४, राहुरी १९, संगमनेर ३६, शेवगाव ३३, श्रीगोंदा १६,, श्रीरामपूर २९ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ७५५ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १६३, अकोले ४५, जामखेड ३५, कर्जत ४९, कोपरगाव ३२, नगर ग्रामीण ३८, नेवासा २७, पारनेर २९, पाथर्डी ६१, राहाता ४५, राहुरी ३७, संगमनेर ८१, शेवगाव १४, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ५३, कॅंटोन्मेंट ०७, मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या: ४०३१७ उपचार सुरू असलेले रूग्ण: ३९८२ मृत्यू: ७२६ एकूण रूग्ण संख्या: ४५०२५
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
|