विक्रम बनकर (नगर) : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जारी केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांना नागपूर, नगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे
कुणाकुणाची तिकीटं कापली?
भाजपने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावं जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांनी नावं कापली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं नाव आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल (Piyush Goyal) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
याशिवाय बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट दिल्याने, त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलं आहे. दुसरीकडे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देऊन, भाजपने मनोज कोटक यांना धक्का दिला.
जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट देऊन भाजपने स्मिता वाघ यांना तिकीट दिलं. तिकडे अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट दिलं.
खासदारांचे तिकीट कापले जाण्यामागची कारणे काय?
- संसदीय कामकाजातील निष्क्रियता
- मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजना घेऊन जाण्यात अपयश
- पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये निष्क्रियता
- पक्षाने आखून दिलेले कार्यक्रम न राबवणे
- पक्षसंघटनेत शून्य सहभाग
भाजपची यादी जाहीर, महाराष्ट्रातून लोकसभेसाठी हे 20 उमेदवारी रिंगणात
१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड पंकजा मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित