विक्रम बनकर(नगर) : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून चालु वर्षीं आज अखेर अल्पमुदत शेती कर्जा करिता ३२११ कोटींचे कर्ज वाटप केले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्पमुदत कर्ज वाटप करणारी आपली बँक एकमेव असून दि ३१ मार्च २०२४ अखेर वसूलास पात्र कर्ज रक्कम कर्जदार शेतक-यांनी वेळेत भरणा करुन रु ३ लाखापर्यंतच्या पिक कर्जास शुन्य टक्के व्याजदराचा फायदा घेण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री श्री. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. ते जिल्हा बँक आयोजीत जिल्ह्यातील वि.का.से. सोसायटीचे सचिव जिल्हा बँक शाखाधिकारी, वसूली अधिकारी यांच्या संयुक्त कर्ज वसूली आढावा बैठकीत अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह येथे आयोजीत प्रसंगी बोलत होते.
महाराष्ट्र शासनाने पिक कर्ज वसूलीला स्थगिती दिली असली तरी शासनाने या कर्जाचे पूनर्गठण करुन देण्याबाबत सुचना केल्या आहेत. परंतु अशा प्रकारचे कर्जाचे पुनर्गठण केल्यास पुणर्गठण तारखेपासून या कर्जास ११% व्याजदर परवडणारा नसल्याने शेतक-यांनी आपले कर्ज ३१ मार्च पुर्वीच भरुन शुन्य टक्क्याचा लाभ घ्यावा. या मुदतीत पिक कर्ज भरणा-या शेतक-यांना १० एप्रिलच्या आत पून्हा पिक कर्ज जिल्हा बँक देणार असल्याने याचा फायदा नियमित कर्जदार म्हणून शेतक-यांनी घ्यावा असे ही आवाहन बँकेचे चेअरमन श्री कर्डिले यांनी करुन ते पूढे म्हणाले की, जिल्हा बँकेने शेतक- यांसाठी एकरकमी कर्जफेड योजना राबवलेली असून जिल्हयातील पात्र थकबाकीदार कर्जदाराने या योजनेचा लाभ घेवून जिल्हा बँकेचे नियमित कर्जदार व्हावे त्यामुळे अशा एक रकमी परतफेड कर्जदार लाभार्थी शेतक-यांनाही जिल्हा बँक त्वरीत कर्ज पूरवठा करणार आहे. असे सांगुन ते पूढे म्हणाले अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आर्थिक दृष्ट्या भक्कम पायावर उभी राहिलेली असून देशातील एक सदृढ जिल्हा सहकारी बँक म्हणून ओळखली जात असून जिल्ह्यातील ठेवीदारांनी जिल्हयाच्या विकासाची कामधेनू असणा-या जिल्हा बँकेत आपल्या ठेवी ठेवाव्यात. यासाठी जिल्हा बँकेकडून इतर बँकापेक्षा ठेवीवर आकर्षक व्याजदर दिले जात आहे.
या प्रसंगी संचालक श्री. प्रशांत गायकवाड हे म्हणाले शासनाने नुकताच सहकार कायदयात बदल करुन जिल्हा केडरला पून्हा पूर्नजिवीत केलेले आहे.
या प्रसंगी खासदार सुजय विखे पाटील, बँकेचे जेष्ठ संचालक माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के, बँकेच्या संचालिका श्रीमती गितांजली शेळके, संचालक अमोल राळेभात, सरव्यवस्थापक जयंत देशमुख, मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी, तालुका विकास अधिकारी, जिल्ह्यातील शाखाधिकारी, वसूली अधिकारी, इन्सपेक्टर्स, वि.का. सोसायटीचे सचिव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शेवटी बैठकीस उपस्थित असलेल्यांचे आभार सरव्यवस्थापक एन. के. पाटील यांनी मानले.