ब्युरो टीम : नवीन वर्षाचे स्वागत व शब्दगंध दिनदर्शिका चे प्रकाशन कोहिनूर मंगल कार्यालय,अहमदनगर येथे सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे’ अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक,सचिव सुनील गोसावी यांनी दिली.

दिनदर्शिका चे प्रकाशन, शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांचा एक जानेवारी ला वाढदिवस असून त्यानिमित्त सायंकाळी सहा वाजता कोहिनूर मंगल कार्यालय येथे शब्दगंध दिनदर्शिका प्रकाशन समारंभ होणार आहे. वाढदिवसानिमित्त कोणीही बुके, फुले,शाल, श्रीफळ आणू नयेत तर आपल्याकडे उपलब्ध असलेली पुस्तके आपण त्यांना भेट देण्यासाठी घेऊन यावीत. सदर पुस्तके नेवासा तालुका शब्दगंध च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या फिरते वाचनालय या उपक्रमास देण्यात येणारं आहेत.तसेच श्रीरामपूर येथील अपंग सामाजिक विकास संस्था व आसाम दिव्यांग संघटनाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या वाचनालयास पाच हजार रुपयाची पुस्तके भेट देण्यात येणार आहेत

वाढदिवसाच्या निमित्ताने आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात येणार असल्याने साहित्यिक व साहित्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांच्याकडून करण्यात आले आहे.