माणूस घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण होय. पूर्वीच्या काळात शिक्षणाची मक्तेदारी एका विशिष्ट वर्गाकडे होती. ही शिक्षणाची ज्ञानगंगा समाजातील बहुजनांच्या दारापर्यंत पोहचविण्याचे काम ह.कृ. तथा बाळासाहेब काळे यांनी केले. त्यांच्या याच विचारांचा वारसा अविरतपणे चालविण्याचे काम अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था करत आहे असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री रामचंद्र दरे यांनी केले.

न्यू आर्टस् कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे आयोजित कै.ह.कृ.तथा बाळासाहेब काळे स्मृतिकरंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वत्कृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के हे उपस्थित होते. त्यांनी ह.कृ.तथा बाळासाहेब काळे यांनी केलेली समाजसेवा तसेच सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान किती मोठे आहे हे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त अरुणाताई काळे डॉ. मेधाताई काळे, विश्वासराव काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बी.बी. सागडे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए. के. पंदरकर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. डि. क. मोटे, तसेच महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमास परीक्षक म्हणून प्रा.सतीश शिर्के व डॉ. आंबदास पिसाळ यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा कदम यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ए.के. अंबाडे सरांनी केले आणि डॉ. राजेंद्र साबळे यांनी उद्घाटनाचे आभार प्रदर्शन केले . डॉ. मीना साळे, प्रा. निलेश लंगोटे, प्रा.निखिल गोयल, डॉ. निलिमा विखे, प्रा.मयुर रोहोकले, प्रा.नितीन काळे या कमिटी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यास मोलाची भूमिका बजावली.