काही दिवसापूर्वी मिलिंद सोमण याचे गोवा येथील न्यूड फोटोशुट चांगलेच चर्चेत होते. आतापण सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे एक न्युड फोटोशूट चांगलेच चर्चेत आहे. हि अभिनेत्री काही सिनेमा व मालिकांमध्ये काम करत असुन तिने एका कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशुट नंतर सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेचा धुरळा उडाला आहे. तिने केलेल्या फोटोद्वारे एक चांगला व वेगळा विषय मांडला आहे.
           या अभिनेत्रीचे नाव वनिता खरात असुन तिने केलेल्या या फोटोशूट नंतर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना त्यासोबत लिहिले आहे की, मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास, मला माझ्या शरीराचा अभिमान आहे … कारण मी, मी आहे.

          वनित खरात सध्या या फोटो मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या ह्या एका फोटोमुळे तिच्या नावाची चर्चा रंगली आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.वनित खरात या आधी शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला कबीर सिंग ह्या चित्रपटा मध्ये दिसली होती तो चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात शाहिद आणि वनिता यांची भूमिका असलेला एक सीन लोकांना प्रचंड आवडला होता.

          तिचा हा फोटो व्हायरल झाल्या नंतर तिला कौतुका सोबतच काही लोकांच्या टीकेचा सामनाही करावा लागत आहे. पण ह्या फोटोशूट मागे एक खास कारण तिने तिच्या पोस्टद्वारे लिहिले आहे. तिने या फोटोद्वारे एक महत्त्वाचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या वजनाचा न्यूनगंड कुठेही न बाळगता वनिता खरातने हा फोटो शेअर केला आहे.