जगातील सर्वात जुनी लोकशाही तसेच स्व:ताला जागतिक महासत्ता म्हणुन मिरवणा-या अमेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टमध्ये मध्ये ट्रम्प समर्थकांनी आज धुडगुस घातला. हाती आलेल्या वृतानुसार ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून हिंसाचार केला आहे.

आज नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीची घोषणा होणार होती. त्याच वेळेस ट्रम्प समर्थकांनी धुडगुस घालण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. या हिंसाचारात एकजन ठार झाल्याचे माहिती हाती आली आहे.

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पराभव मान्य नाही. ते सत्तेवर राहण्यासाठी सर्व मार्ग अवलंबत आहे. आज अमेरिकन संसदेत जो बायडन यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात येणार होती. त्याचवेळेस ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिल बाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यातच त्यांनी संसदेच्या इमारतीत घुसखोरी केली. यामुळे संसदेत एकच गोंधळ निर्माण झाला. सुरक्षितेच्या दृष्टीने सिनेट सभागृहाचे दरवाजे सुरक्षितपणे बंद करण्यात आले. खासदारांना सुरक्षितेच्या दृष्टीने लष्कराच्या एका छावणीत नेण्यात आले. या घटनेमुळे वॉशिंग्टमध्ये गृहयुद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. या बाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर वर व्यक्त केली चिंता त्यांनी लिहले आहे कि,

वॉशिंग्टन डीसीमध्ये दंगा आणि हिंसाचाराच्या बातम्या पाहून व्यथित झालो. सत्ता हस्तांतरण हे व्यवस्थित आणि शांततेत चालू ठेवले पाहिजे. बेकायदा निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला विकृत केले जाऊ शकत नाही.

नरेंद्र मोदी