श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र, अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माणसाठी दि.०१ जानेवारी, २०२१ पासुन सुरु झालेल्या निधी समर्पण अभियान अंतर्गत नगर शहरातील नागापूर MIDC अ.नगर येथील अनंत इंजिनियर्स आणि फेब्रिकेटर्स या कंपनीतर्फे श्री.नंदकिशोर नातु यांनी १,००,००१/- रुपये श्रद्धानिधीचा धनादेश संकलन करणा-या रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकांकडे सुपुर्द केला.

           यावेळी रा.स्व.संघाचे जिल्हा संघचालक डॉ.रविंद्र साताळकर,जिल्हा कार्यवाह श्री.श्रीकांत जोशी, शहर कार्यवाह श्री.हिराकांत रामदासी, श्री.धिरज हिरवे, श्री. वैष्णव मोरे, श्री.प्रसाद कुलकर्णी (सर),श्री.कुलदीप कुलकर्णी,श्री.ऋषिकेश जोशी व हे उपस्थित होते.