काल पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ( serum institute ) आग लागली. या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना सीरम इन्स्टिट्यूट तर्फे प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. |
|
सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही अनपेक्षित घटना आहे. ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबांबद्दल संवेदना व्यक्त करतो. तसंच या घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. |