युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा जागतिक स्तरावरील सात कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक श्री. डिसले यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्त विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते श्री. प्रवीण दरेकर यांनी रणजितसिंह डिसले गुरुजींची आज सदिच्छा भेट घेतली.यावेळी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते श्री. प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी रणजितसिंह डिसलेंची शिफारस करणार असे म्हंटले आहे. या भेटीच्या वेळी त्यांच्या सोबत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,पंचायत समिती सभापती अनिल डिसले,नगराध्यक्ष असीफ तांबेळी,तालुका अध्यक्ष मदन दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. |
|