PIB Mumbai: माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’च्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वेने ऑनलाईन रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी त्यांची ई-तिकीट संकेतस्थळ www.irctc.co.in आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाइल अॅपचे नूतनीकरण केले आहे. “बेस्ट-इन-क्लास” सारखी वैशिष्ट्ये असणाऱ्या या सुधारित ई-तिकीट वेबसाइट आणि अॅपचे उदघाटन आज 31 डिसेंबर, 2020 रोजी माननीय रेल्वेमंत्री आणि वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी केले. सर्व प्रवाशांना रेल्वेने दिलेली ही नव वर्षाची भेट असेल. |
|
● प्रवाशांचा वेळ कमी करण्यासाठी आणि आरक्षणाचा अनुभव सुलभ करण्यासाठी एका पृष्ठावर गाडी शोधून तिच्या निवडीची माहिती तेथेच दर्शविण्यात आली आहे. |