मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेच्यावतीने सागर लोधी लिखित ,”तुझ्या जागी मी असते तर..!” या बालनाट्याचे अभिवाचन करण्यात आले.
           आई आणि मुलींच्या जागा बदलल्या तर प्रत्येकीला आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये सहज समजून त्यांच्यातील नाते अजून सुंदर होते हे या अभिवाचनातून ऐश्वर्या नाईकवाडी व मुग्धा घेवरीकर यांनी सुरेख वाचिक अभिवाचनातून प्रभावीपणे मांडले.
           प्रारंभी नटराज पूजन करण्यात आले. संयोजन नाट्य परिषदेचे पदाधिकारी उमेश घेवरीकर, माफीज इनामदार, भगवान राऊत, भाऊ काळे, भाऊसाहेब शिंदे व सुहास लहासे यांनी केले.