महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत कार्यरत असलेला शेतकरी प्रथम प्रकल्प व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे व कणगर या गावात या आठवड्यामध्ये तीन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिंचविहिरे येथे दि.२३ नोव्हेंबर २०२० रोजी पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभाग, मफुकृवि, राहुरी येथील प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र निमसे यांनी परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दुसरे व तीसरे प्रशिक्षण अनुक्रमे दि.२५ व २७ नोव्हेंबर २०२० रोजी कणगर येथे पार पडले. यावेळी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, मफुकृवि, राहुरी येथील पशुसंवर्धनाचे विषय विशेषज्ञ डॉ.सुनिल अडांगळे यांनी परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण शास्त्रज्ञांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शेतकरी प्रथम प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री. विजय शेडगे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रक्षेत्र सहाय्यक श्री.किरण मगर यांनी तर आभार श्री.राहुल कोन्हाळे यांनी मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी चिंचविहिरे व कणगर या गावातील शेतकरी व महिला उपस्थित होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.शरद गडाख आणि प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ.पंडित खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले. |