प्राप्तिकर विभागाने, आयटी सेझ विकासकचे माजी संचालक आणि चेन्नईतील स्टेनलेस-स्टीलचे प्रमुख पुरवठादार यांच्याशी संबंधित चेन्नई, मुंबई, हैदराबाद आणि कुडलोर येथील 16 ठिकाणी २७.११.२०२० रोजी छापे टाकले. यात माजी संचालक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गेल्या ३ वर्षात सुमारे १०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचे पुराव्यामध्ये निष्पन्न झाले आहे. एका निर्माणाधीन प्रकल्पात आयटी सेझ विकासकाने काम सुरु असल्याचे १६० कोटी रुपयांचे खोटे दावे सादर केल्याचेही तपासात समोर आले आहे. या कंपनीने सल्लागारांचे बनावट शुल्क म्हणून सुमारे ३० कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचा आणि २० कोटी रुपयांच्या अस्वीकारार्ह व्याज शुल्काचाही दावा केला होता. या धाडीमध्ये आयटी सेझ विकासकाशी संबंधित काही समभाग खरेदी व्यवहार उघडकीला आले. या संस्थेच्या समभागांची विक्री त्याच्या पूर्वीचे भागधारक, रहिवासी आणि अनिवासी संस्था यांनी केली होती, ज्यानी २०१७-१८ या आर्थिक वर्षात मॉरीशस इथल्या मध्यस्थाद्वारे २३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती मात्र या विक्री व्यवहारातून झालेला भांडवली नफा प्राप्तिकर विभागाकडे जाहीर करण्यात आला नाही. दोन्ही भागधारकांकडील अघोषित भांडवली नफा निश्चित करण्यासाठी चौकशी सुरू आहे. रोख रकमेसह अन्य जमीन व्यवहार आणि अनिवार्य परिवर्तनीय रोख्यांशी संबंधित प्रकरणांचीही तपासणी केली जात आहे स्टेनलेस-स्टील पुरवठादाराकडे सापडलेल्या पुराव्यांवरून असे आढळून आले आहे की पुरवठादार गट हिशेबी , बेहिशेबी आणि अंशतः हिशेबी असे विक्रीचे तीन व्यवहार करत आहे. बेहिशेबी आणि अंशतः हिशेबी विक्रीचे प्रमाण दरवर्षी एकूण विक्रीच्या २५% पेक्षा जास्त होते . तसेच त्यांनी विविध ग्राहकांना सेल्स अकोमोडेशन बिले दिली आहेत आणि या व्यवहारांवर १०% पेक्षा जास्त कमिशन प्राप्त केले आहे. सध्या बेहिशेबी उत्पन्नाचे मूल्यांकन केले जात असून ते अंदाजे १०० कोटी रुपये आहे. वित्तपुरवठा, सावकारी कर्ज आणि गृहनिर्माण विकासामध्ये हा गट सहभागी आहे. या कंपनीने केलेले बेहिशेबी व्यवहार आणि तेथील बेहिशेबी भांडवल / कर्जाचा ओघ सुमारे ५० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंतच्या या धाडीत ४५० कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी उत्पन्न सापडले आहे. यात पुढील तपास सुरु आहे.अशी महिती केंदीय अर्थ मंत्रालयनी दिली आहे. |