आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आज आत्महत्या केली. त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. शीतल करजगी आमटे या डॉ. बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. गौतम करजगी हे महारोगी सेवा समितीच्या विश्वस्तमंडळावर आहेत. त्यांना शर्विल नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे. उत्तरीय तपासणीसाठी डॉ शीतल आमटे- करजगी याचा मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयातून चंदपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला आहे. आज सकाळी ५.४५ च्या सुमारास एक ट्विट केले होते सुरवातीला वॉर अँड पिस असे शब्द लिहुन त्याखाली एक पेंटिंग शेअर केले होते. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्याची बातमी आल्या नंतर बऱ्याच जणांनी त्या ट्विट वर श्रद्धांजली वाहिली असून हळहळ व्यक्त केली आहे.
|