फर्ग्युसन महाविद्यालयाने वार्षिक शुल्कात वाढ केल्याने ग्रामिण व दुर्गम भागातील वंचित घटकांना ही शुल्कवाढ भरणे शक्य नाही.या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शुल्क वाढ न करण्याची सुचना सर्व संलग्न महाविद्यालयांना केली होती.तसेच महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण संचालनालय यांनी सुद्धा परिपत्रक काढून या शैक्षणिक वर्षात शुल्क वाढ करू नये असे सांगितले असे असताना सुद्धा फर्ग्युसन महाविद्यालयाने मागिल वर्षी पदवी प्रथम वर्षासाठी शुल्क वाढ केली होती.गेल्या वर्षी द्वितीय वर्ष कला शाखेसाठी २४७० रू , विज्ञान शाखेसाठी ३५५० रू शुल्क होते.या पार्श्वभूमीवर यंदा शुल्कवाढ करून कला शाखेसाठी ६४७० रू आणि विज्ञान शाखेसाठी ७५५० रू निश्र्चित करण्यात आले आहे.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिपत्रकास केराची टोपली दाखवून अडीचपट शुल्कवाढ केली आहे. |
आणखी बातम्या
MHT-CET परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षा केंद्रे. नगरशहर शिवसेनेत धुसफूस, पदाधिकाऱ्याचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र. कोरोना व त्याचा शैक्षणिक वर्गावर झालेला परिणाम आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज. |