दौंड तालुक्यातील पाटसचे मंडल अधिकारी व तलाठी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शेतजमीन दप्तरी बेकायदेशीर नोंद केल्याप्रकरणी तक्रारदार प्रशांत ठोंबरे यांनी बुधवार (ता.०७) रोजी जिल्हा अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
          पाटस येथील शेतजमीनीचा मिळकती गट क्रमांक १४७ब, २८७/६ व २८८/२ या तीन मिळकती संदर्भात तलाठी यांनी नोंद केलेला फेरफार क्रमांक १५४१३ बाबत प्रशांत ठोंबरे यांनी हरकत घेत मंडल अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती, संबंधित शेतजमीनीच्या फेरफार व तीन गट क्रमांकावर मृत्यूपत्राप्रमाणे नोंद करण्याची मागणी पाटसचे मंडल अधिकारी यांच्याकडे केली होती, यावेळी मंडल अधिकारी यांनी ३१ जुलै रोजी विरोधात निकाल दिल्याने तक्रारदार यांनी दौंड पुरंदर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील केले होते, या तक्रारीबाबत उपविभागीय अधिकारी यांनी मंडल अधिकारी यांच्या निर्णयाबाबत कोणतीही अंमलबजावणी करू नये अशा प्रकारे “जैसे थे” आदेश दिले होते. परंतु सदर आदेशाविरुद्ध कामकाज करत शेतजमीन ७/१२ व फेरफार क्रमांक १५४१३ ची दप्तरी २४ सप्टेंबर रोजी बेकायदेशीर नोंद केली आहे. दरम्यान, मंडल अधिकारी व तलाठी (पाटसगाव) यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी व दौंड तहसीलदार यांच्याकडे मंगळवार (ता.०६) रोजी लेखी तक्रारी व्दारे केली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांना दिले आहेत.

आणखी बातम्या

काशी और मथुरा पर शुरू हुई चर्चाओं पे मा.शरदरावजी पवार ने जताई चिंता ।

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला वनाधिकार नियमात महत्वपुर्ण बदल.

नगराध्यक्षा बहिणीने मंत्री असलेल्या भावाकडे ‘मराठा आरक्षण मिळाले पाहिजे’ अशी मागितली ओवाळणी.

भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी.