शब्दांकन- सिध्दी कुलकर्णी.
           Film For Change ही दृष्टी ठेऊन “अहमदनगर फिल्म फौंडेशन” या संस्थेला आज 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. अहमदनगर मध्ये चित्रपटांकरीता एक व्यासपीठ खुले करून कलाकारांना, रसिकांना तसेच तंत्रज्ञांना चित्रपटा संदर्भात मदत, शिक्षण आणि प्रोत्साहन देणे हेच या संस्थेचे ध्येय आहे.
           अहमदनगर मध्ये चित्रपट रसिकांना एकत्र करुन चित्रपटाबाबतची साक्षरता वाढवणे तसेच जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांचा संग्रह करून ते रसिकांना उपलब्ध करून त्यांना पडद्यावर दाखवण्याचे काम “अहमदनगर फिल्म फाऊंडेशन” करीत आहे. त्याचसोबत “अहमदनगर फिल्म फाऊंडेशन ” चित्रपट, टी. व्ही. शो, वेब शो इ.सर्वच ठिकाणी तंत्रज्ञ आणि कलाकार पुरवण्याचे काम करत आलंय आणि करत राहील. आतापर्यंत या संस्थेतर्फे मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी अहमदनगर मधील कलाकारांना प्राधान्य देण्यात आले आहे व यापुढेही अहमदनगर येथील कलाकारांना संधी उपलब्ध होईल याकडे विशेष लक्ष असेल. फाउंडेशन तर्फे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गेल्या 2 वर्षांचे नियोजन अतिशय यशस्वी झाले होते. याही वर्षी जोमात नियोजन सुरू आहे. असेच वर्षानुवर्षे “अहमदनगर फ़िल्म फाऊंडेशन” कार्यरत राहील..!

आणखी बातम्या

काशी और मथुरा पर शुरू हुई चर्चाओं पे मा.शरदरावजी पवार ने जताई चिंता ।

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला वनाधिकार नियमात महत्वपुर्ण बदल.

नगराध्यक्षा बहिणीने मंत्री असलेल्या भावाकडे ‘मराठा आरक्षण मिळाले पाहिजे’ अशी मागितली ओवाळणी.

भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी.