अहमदनगर जिल्ह्यात आज दिनांक 10 ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वाजेपर्यंत ७७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ३८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४०५४ इतकी झाली आहे.
           जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १२७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६९ आणि अँटीजेन चाचणीत २४९ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५८, अकोले १९, जामखेड ०३, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १०, पारनेर ०४, पाथर्डी ०२, राहुरी ०१, शेवगाव ०८, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १६९ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५१, अकोले ०७, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण १७,, नेवासा १३, पारनेर ०५, पाथर्डी ०५, राहाता २३, राहुरी ०९, संगमनेर २९, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २४९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १३, अकोले १९, जामखेड २०, कर्जत २०, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण ०१, नेवासा १७, पारनेर ०५, पाथर्डी ४५, राहाता १९, संगमनेर ४७, शेवगाव ११, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
           दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १४०, अकोले ७९, जामखेड ३७, कर्जत २३, कोपरगाव २३, नगर ग्रा. ३१, नेवासा ४४, पारनेर ३३, पाथर्डी ६६, राहाता ८२, राहुरी २६, संगमनेर ४०, शेवगाव ३३, श्रीगोंदा ८३, श्रीरामपूर ३२, मिलिटरी हॉस्पिटल ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

   बरे झालेली रुग्ण संख्या: ४५३८२
   उपचार सुरू असलेले रूग्ण: ४०५४
   मृत्यू: ७८७
   एकूण रूग्ण संख्या: ५०२२३

   (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)