राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये बदल करीत, अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी कुटुंबांना, निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
           सदर अधिसूचनेची मुळे अनुसूचित क्षेत्रात, परंपरेने राहत असलेले वननिवासी तसेच अनुसूचित जमातीतील लोकांना दिलासा मिळणार असून, त्यांचे मूळ गावातून स्थलांतर कमी होईल अशी अपेक्षा आहे.सदर अधिसूचना राज्यपालांनी संविधानाच्या पाचव्या अनुसूचिततील परिच्छेद ५, परिच्छेद ०१ अंतर्गत असलेल्या प्राप्त अधिकारांचा वापर करून काढली आहे.
           अनुसूचित क्षेत्र असलेल्या पालघर, नंदुरबार आणि गडचिरोली यांसह इतर जिल्ह्यांच्या भेटीदरम्यान, राज्यपालांच्या निदर्शनास आले होते की, काही अनुसूचित जमाती आणि वननिवासी कुटुंबे अनुसूचित क्षेत्रातील त्यांच्या मूळ वस्तीस्थान, यापासून वाढलेल्या कुटुंबासाठी जागा उपलब्ध नसल्याने, इतरत्र स्थलांतर करीत आहेत. या संदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा करून सदर अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

आणखी बातम्या

काशी और मथुरा पर शुरू हुई चर्चाओं पे मा.शरदरावजी पवार ने जताई चिंता ।

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल.

नगराध्यक्षा बहिणीने मंत्री असलेल्या भावाकडे ‘मराठा आरक्षण मिळाले पाहिजे’ अशी मागितली ओवाळणी.

भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी.