उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या सामुहिक अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने चौपाटी कारंजा ते दिल्लीगेट कँडल मार्च काढण्यात आला होता. हा कॅन्डल मार्च दिल्लीगेट येथे आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकाराचा निषेध करण्यात येऊन मुख्यमंत्री योगी व तेथील पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
           यावेळी माजी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, उत्तर प्रदेशमध्ये लोकशाही नसून जंगलराज सुरु आहे. तेथील महिला सुरक्षित नसून त्यांच्यावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे योगी सरकारवरील तेथील जनतेचा विश्‍वास उडाला आहे, पोलिस प्रशासनाच्या मदतीने दबावाचे राजकारण करुन गुंडांना मोकळे रान करुन देत आहे. तेव्हा योगी सरकार बरखास्त करुन पिडितेच्या कुटूंबियांना संरक्षण देऊन न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी पुढाकार घेईल. अत्याचार करणार्‍या आरोपींना कडक शासन होण्यासाठी संबंधित खटला उत्तर प्रदेशच्या बाहेरील न्यायालयात चालवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
          यावेळी आशा निंबाळकर, अरुणा गोयल, अंबादास पंधाडे आदिंनी आपल्या भावना व्यक्त करुन हाथरस येथील घटनेचा निषेध करुन योगी सरकारवर टिका केली व पिडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. शांततेत निघालेल्या या कॅन्डल मार्चमध्ये महिला मोठ्यासंख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी पिडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली
          या कॅन्डल मार्च मध्ये माजी महापौर सुरेखा कदम, महिला जिल्हा प्रमुख आशा निंबाळकर, शहर प्रमुख अरुणा गोयल, सुजाता कदम, हेमा खैरे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, जेष्ठ नेते अंबादास पंधाडे, संजय शेडगे, गणेश कवडे, दत्ता कावरे, सूरज शेळके, रमेश परतानी, संतोष शिंदे आदी सहभागी झाले होते.

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल.

ओळख कायद्याची – कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा २००५.

भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी.