शिर्डी जवळील टोल नाक्यावर ट्रक आडवुन खुनासहित दरोडा टाकणारे सराईत आरोपी २४ तासाचे आत पोलिसांनी जेरबंद केले. लोणी पोलीस स्टेशन व नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान, याप्रकरणात एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
दिनांक ०७/०९/२०२० रोजी फिर्यादी भुपेंद्रसिंह ठाकुर यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांचा साथीदार कुलदीपसिंह तुंग हे दोघे ट्रक गाडीतुन गहु भरुन इंदोर येथुन बैंगलोर येथे जात असतांना, दिनांक ०६/०९/२०२० रोजी रात्री १०.१५ च्या सुमारास निर्मळपिंप्री शिवारात मनमाड-अहमदनगर रोडवर असलेल्या टोलनाक्या जवळ ६ ते ७ जणांनी मालट्रकला आडवे होवुन व लाकडी दांडक्यांचा, तलवारीचा व चाकुचा धाक दाखवून ट्रक थांबवला आणि फिर्यादी व त्याच्या साथीदारावर चाकूचे वार केले. यात कुलदीपसिंह तुंग (वय ४८) वर्ष हे ठार झाले.
तसेच दिनांक०७/०९/२०२० रोजी फिर्यादी खालीद शेख यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, फिर्यादी व त्यांचा साथीदार आयुब शेख हे दोघे ट्रक मधुन गहु भरुन मालेगाव येथुन बैंगलोर कडे जात असतांना दिनांक ०६/०९/२०२० रोजी रात्री १०.०० च्या सुमारास निर्मळपिंप्री शिवारात मनमाड-अहमदनगर रोडवर असलेल्या टोलनाक्या लघुशंकेसाठी थांबले असता ६ ते ७ जणांनी फिर्यादीस तलवार, लाकडी दांडके व चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील रोख रक्कम २५०००/- रु. बळजबरीने काढुन घेतले. त्याचा ही गुन्हा लोणी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.
सदर दोन्ही गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री. सागर पाटील, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सोमनाथ वाकचौरे व स्थानिक गुन्हे शाखाचे श्री.दिलीप पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळाची अंगुलीमुद्रा तज्ञ, डॉग स्कॉड व फॉरेन्सीक व्हॅन यांचे मदतीने अत्यंत बारकाईने पहाणी केली व सर्व संबधीत अधिकारी यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सुचना दिल्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या सुचनाप्रमाणे स्थानिक पोलीसांचे दोन पथके व स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली. या पथकांनी ८ आरोपीना २४ तासाचे आत कोल्हार परीसरातुन शिताफीने जेरबंद केले आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपी असलेला अजून एक इसम फरार असुन त्याचा शोध चालु आहे .
जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचार्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी पूर्ण